
अहमदनगर (दि.६ एप्रिल):-विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शहरातून निघणाऱ्या जयंती मिरवणुक सोहळ्यात निळ्या झेंडयाशिवाय इतर कोणताही झेंडा घ्यायचा नाही.

याचे कारण असे कि मागच्या डॉ.आंबेडकर जयंती मिरवणुकीत इतर झेंडे,व इतर घोषणा दिल्यामुळे जातीय ताण तणाव निर्माण झाला होता.व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले.त्यामुळे या मिरवणुकीत निळ्या झेंडया शिवाय कोणताही झेंडा नको असे प्रतिपादन मा.नगरसेवक अजय साळवे यांनी केले.क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीची बैठक दादासाहेब रुपवते विद्यालय येथे आज संपन झाली.यावेळी बैठकीचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते,ते पुढे म्हणाले,मिरवणुकीत जास्तीत जास्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे वाजवावेत,मिरवणुकीत निळ लावावी पण निळ उधळू नये.
तसेच प्रत्येक मंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आभिवादन करूनच मिरवणुकीत सहभाग नोंदवीने महत्वाचे आहे.तसेच शक्य असल्यास महिलांसाठी होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम राबविले तर एक आदर्श जयंती होईल.असे साळवे यांनी सांगितले.यावेळी निलक्रांती चौक, सिद्धार्थनगर,सर्जेपुरा कौलारू,माळीवाडा,नागापूर, गांधीनगर,रेल्वेस्टेशन, मंगलगेट,डॉन बॉस्को, सावेडी, आंबेडकर चौक,बोल्हेगाव आदी भागातील कार्यकर्त्यांनी मिरवणुकी बाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी प्रा.जयंत गायकवाड,रोहित (बंडू ) आव्हाड,अंकुश मोहिते,तुकाराम गायकवाड, महेश भोसले,विशाल गायकवाड,सुजित घंगाळे, निखिल साळवे,प्रतिक शिंदे, मृणाल भिंगारदिवे,आकाश गायकवाड,बबलू भिंगारदिवे, ओम भिंगारदिवे,ऋषी विधाते, जय कदम,किरण शिंदे,अक्षय साळवे,स्वप्नील शेलार,दिनेश राजगुरू,वृषाल साळवे, कौशल गायकवाड,किरण पवार,राहुल साळवे,श्रीकांत भोसले,प्रशांत भोसले,सुशांत शिरसाठ,शुभम जाधव,गौरव वाघचौरे,अक्षय चव्हाण, सुहास शिरसाठ,स्वप्नील भिंगारदिवे,आकाश सरोदे,विजय भिंगारदिवे, राजेंद्र गोरे,सिद्धांत भिंगारदिवे,राज भिंगारदिवे, सदाशिव भिंगारदिवे,चंद्रकांत भिंगारदिवे,विनोद भिंगारदिवे, सुभाष भिंगारदिवे,पंकज दिवे, प्रथमेश साठे,नामदेव भिंगारदिवे,यादव भिंगारदिवे, सोनू शिंदे,संदीप वाघचौरे, सागर साळवे,बाळासाहेब निकम,गौरव पाटोळे,गणेश डबाळे,आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक रोहित (बंडू ) आव्हाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा.जयंत गायकवाड यांनी केले.