
अहमदनगर (दि.८ एप्रिल):-गावठी बनावटीचे पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या इसमास पिस्तुल व जिवंत काडतुसासह तोफखाना पोलिसांनी पकडले.हि कारवाई दि.७ एप्रिल रोजी तारकपुर बस स्थानका बाहेर रोडवर करण्यात आली.
तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना तारकपुर बसस्थानका बाहेर रोडवर एक इसम गावठी बनावटीचे पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी मिळाली होती.मिळालेल्या बातमी प्रमाणे पोनि/कोकरे यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांना बातमीतील ठिकाणी जाऊन कारवाई करण्यास सांगितले.पथक तारकपुर बसस्थानका बाहेरील बाजुस सापळा लावला थांबले असताना काही वेळातच रोडच्या बाजुस आलेल्या एका इसमाची हालचाल संशयास्पद असल्याने त्या इसमास गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विशाल पांडुरंग बोरूडे (रा.वारुळाचा मारूती विटभट्टी नालेगाव मुळ.रा.वाघ वाडी, लोहगाव,ता.नेवासा जि.अहमदनगर) असे सांगितले.
त्याची झडती घेतली असता त्याचे कब्जात गावठी बनावटीचे स्टिलचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे असा एकुण 31,000/- रु.कि.चा मुद्देमाल मिळुन आल्याने पोकॉ/सतिष पोपट भवर, यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन येथे गु.र.नं-447/2024 आर्म ॲक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो.उपनिरी.शैलेश पाटील हे करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक.श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री.अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखालील पो.नि.श्री.आनंद कोकरे यांच्या पथकातील पो.उपनिरी शैलेश पाटील,पोहेकॉ/दिनेश मोरे,भानुदास खेडकर, दत्तात्रय जपे,सुनिल शिरसाट, अहमद इनामदार,सुधिर खाडे, पोनावसिम पठाण,संदिप धामणे,सुरज वाबळे, पोकॉ/सुमित गवळी,सतिष त्रिभुवन, सतिष भवर,बाळासाहेब भापसे,शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर यांनी केली आहे.