
अहमदनगर (दि.८ एप्रिल):-कुष्ठधाम रोडवर रसवंती चरख्याचे इंजीन चोरणारा आरोपी तोफखाना पोलिसांनी २४ तासात मुद्देमालासह ताब्यात घेतला आहे.
दि.७ एप्रिल रोजी फिर्यादी विशाल सुनिल जगताप हे कुष्ठधाम रोडवर रसवंतीचे दुकानातील दि.६ एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास दुकान बंद करुन घरी गेले असता दि.दि.७ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास दुकानावर गेले असता त्यांना रसवंतीचे चरख्यास लावलेले 15,000/- रू.कि.चे होंडा कंपनीचे झीक्स मॉडेलचे लाल रंगाचे इंजीन दिसुन आले नाही.
त्यांनी आजुबाजूस शोध घेतला असता इंजिन मिळुन न आल्याने कोणीतरी अज्ञात इसम इंजिनची चोरी करुन घेवुन गेल्याची खात्री झाल्याने त्यांनी या बाबत तोफखाना पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं 446/2024 भा.दं.वि.379 प्रमाणे दि.07/04/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस निरीक्षक, श्री.आनंद कोकरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार नमुद गुन्ह्याचा कुष्ठधाम रोडवर तसेच परिसरात तपास करत असताना सदरचा गुन्हा हा राम सुदाम सौदागर याने केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यावर या आरोपीचा वैदुवाडी येथे शोध घेतला असता आरोपी राम सुदाम सौदागर हा मिळुन आल्याने त्याला ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने त्याचे कब्जातुन 15,000/- रूकि.चे होंडा कंपनीचे झीक्स मॉडेलचे लाल रंगाचे इंजीन जप्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक.श्री राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखालील पोनि. श्री.आनंद कोकरे यांच्या पथकातील पो.उपनिरी शैलेश पाटील,पोहेकॉ/दिनेश मोरे, भानुदास खेडकर,दत्तात्रय जपे,सुनिल शिरसाट,अहमद इनामदार,सुधिर खाडे, पोना/वसिम पठाण,संदिप धामणे,सुरज वाबळे, पो.कॉ.सुमित गवळी,सतिष त्रिभुवन,सतिष भवर, बाळासाहेब भापसे,शिरीष तरटे,दत्तात्रय कोतकर यांनी केली आहे.