
अहमदनगर (दि.८ एप्रिल):-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक १ अहमदनगर यांनी कर्जत तालुक्यातील राशीन शिवारात हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रावर दि.८ एप्रिल रोजी कारवाई केली आहे.
या कारवाईत तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून ३८५० लिटर गावठी दारू निर्मितीसाठी लागणारे कच्चे रसायन व ७५ लिटर हातभट्टी गावठी दारू,तसेच हातभट्टी गावठी दारू निर्मितीचे लोखंडी बॅरल प्लास्टिक बॅरल व इतर साहित्य जागीच नष्ट करण्यात आले.या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत रुपये १८,०८००/- इतकी आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक श्री.प्रमोद सोनोने, उपाधीक्षक श्री.प्रवीण कुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्रमांक १ चे निरीक्षक श्री.सुरज कुसळे, दुय्यम निरीक्षक आनंद जावळे,सर्वश्री जवान अविनाश कांबळे,देवदत्त कदरे,महिला जवान शुभांगी आठरे यांनी केली आहे.