शोध मोहिमे दरम्यान धारदार सुरा बाळगणारा जेरबंद भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई
अहमदनगर (दि.८ एप्रिल):-भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे शोध मोहीम पथकातील पोलिस अंमलदार भिंगार परिसरात पेट्रोलिंग करत असताना कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि/योगेश राजगुरू यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की एक तरुण भुईकोट किल्ला मैदाना जवळील काटवण्यात एका मोपेड गाडीच्या डिक्की मध्ये धारदार सुरा घेऊन काहीतरी अनुचित प्रकार घडण्याच्या बेतात आहे.
अशी बातमी मिळाल्याने सपोनि/योगेश राजगुरू यांनी तत्काळ या घटनेची माहिती अंमलदार यांना देऊन कारवाई करण्यास सांगितले. अंमलदार त्या ठिकाणी गेले असता एक तरुण मोपेड गाडीवर संशयीतरीत्या बसलेला दिसला त्या त्या तरुणाची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली.
त्याच्या मोपेड गाडीची तपासणी केली असता गाडीचे डिक्कीत एक लोखंडी मोठा सुरा मिळून आला त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विशाल विष्णू मुसळे असे सांगितले. त्याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुरन ३६६/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेशोला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी योगेश राजगुरू यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ/दीपक शिंदे,पोहेकॉ/संदीप घोडके,पोकॉ/शिरसाट,पोकॉ/थोरात,पोकॉ/आव्हाड यांनी केली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बारगजे करत आहे.