Maharashtra247

गौमांस वाहतुक करणाऱ्या इसमावर कोतवाली पोलीसांची धडक कारवाई

अहमदनगर (दि.८ एप्रिल):-कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांना खात्रीलायक बातमी मिळाली की,एक इसम काही वेळात त्याचे ताब्यातील होंडा सिटी कार नं.एम.एच.04.सी. जे. 1883 ही मधुन गौवंश जनावरांचे मांस घेवुन अहमदनगर ते पुणे दिशेने जाणार आहे.

पोनि/दराडे यांनी गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना पंचासह जावुन कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते.गुन्हे शोध पथकांचे अंमलदार यांनी तात्काळ पंचाना बोलावुन घेवुन नमुद बातमीतील गाडीचा शोध घेतला असता गोमास घेऊन जाणारी गाडी ही केडगाव बायपास चौक,येथे दिसली असता नमुद वाहन चालकास थांबवून त्यास पोलीस व पंचाची ओळख करुन देवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव साजिद खाजामियाँ कुरेशी (रा.सदर बाजार भिंगार) असे असल्याचे सांगितले.गुन्हे शोथ पथकांचे अंमलदार यांनी उपस्थित पंचासमक्ष नमुद इसमाचे ताब्यातील वाहनाची तपासणी केली असता वाहनाचे डिक्कीत तीन प्लॅस्टीकचे गोण्यांमध्ये अंदाजे 20.000/-रुपये किमतीचे अंदाजे 100 किलो गोवंश जनावरांचे मांस मिळून आले.

पोकॉ/सचिन लोळगे यांच्या फिर्यादीवरून साजिद खाजामियाँ कुरेशी याचे विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुःर.नं. 454/2024 भा.द.वि.क.269 सह महा. प्राणी संरक्षण ( सुधारणा ) अधिनियम कलम 5(क),9(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक शप्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार सपोनि/योगिता कोकाटे,पोहेकॉ/शाहीद शेख,पोहेकॉ/योगेश भिंगारदिवे,पोहेकॉ/ए. पी.इनामदार,पोना/अविनाश वाकचौरे,मपोना/संगिता बडे,पोकॉ/दिपक रोहोकले, पोकॉ/सत्यजित शिंदे,पोकॉ/ तानाजी पवार,पोकॉ/सुरज कदम,पोकॉ/अमोल गाडे, पोकॉ/अभय कदम,पोकॉ/ सूजय हिवाळे,पोकॉ/शिवाजी मोरे,पोकॉ/सचिन लोळगे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page