काटवनात कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या ४४ गोवंशीय जनावरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिले जीवदान
अहमदनगर (दि.९ एप्रिल):-राहाता तालुक्यातील ममदापुर येथून महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले 2 लाख 1,000/- रुपये किंमतीचे 44 जिवंत गोवंश जनावरे ताब्यात घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ५ आरोपींवर लोणी पोलीस स्टेशन गु.र.नं. 217/2024 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम 5 (अ), (ब), 9 (ब) सह प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 3 व 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना इसम नामे अक्रम कुरेशी,जब्बार कुरेशी,सद्दाम कुरेशी,रिजवान कुरेशी व फैजान कुरेशी सर्व रा. ममदापुर,ता.राहाता अशांनी काही गोवंश जातीची लहान मोठी जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने काटवनात निर्दयतेने बांधुन ठेवलेली आहे.आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार अशांचे पथके नेमुण तसेच लोणी पोस्टेचे अधिकारी व अंमलदार यांना सोबत घेवुन बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथके रवाना केली.
पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी ममदापुर ता. राहाता गांवातील काटवनात गोवंश जातीची लहान मोठी जनावरे निर्दयतेने बांधलेली दिसुन आली व त्यांचे जवळच काही इसम उभे असलेले दिसले.पथकाची खात्री होताच पथक संशयीतांकडे जात असताना त्यांना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते काटवनात पळुन गेले. काटवनात बांधुन ठेवलेली जनावरे पळुन गेलेल्या इसमांच्या मालकीची आहेत व ती कत्तलीसाठी बांधुन ठेवल्याचे समजले.पथकाने लागलीच काटवनात बांधलेली लहान मोठी गोवंशी जनावरे ताब्यात घेवुन आरोपींवर गुन्हा दाखल केला.
पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर,श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव व अंमलदार बाळासाहेब मुळीक,दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे,बबन मखरे,संदीप पवार,सचिन अडबल,भिमराज खर्से, शिवाजी ढाकणे,मयुर गायकवाड,जालिंदर माने, सागर ससाणे,मच्छिंद्र बर्डे, रोहित मिसाळ,अमोल कोतकर,बाळासाहेब गुंजाळ, भाऊसाहेब काळे,विशाल तनपुरे,अमृत आढाव, उमाकांत गावडे,संभाजी कोतकर व अरुण मोरे यांनी केलेली आहे.