
अहमदनगर (दि.१७ एप्रिल):-लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिर्डी लोकसभा मतदार संघ अंतर्गत आदर्श आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने १६ व १७ एप्रिल रोजी धडक कारवाया केल्या आहेत.
यात कोल्हार घोटी रोड विटा शिवार राजूर अकोले या परिसरात खाजगी वाहनातून बेकायदेशीर रित्या देशी दारूची वाहतूक होत आहे अशी खात्रीशीर माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती.राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभागाचे पथकाने सापळा रचून मारुती ८०० चारचाकी वाहनातून देशी बॉबी संत्रा दारूचे तब्बल ७५ हजार रुपयांचे बॉक्स जप्त केले.
तसेच संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे अवैधरित्या सार्वजनिक ठिकाणी चालणारे दारूचे गुत्त्यांवर हि पथकाने छापा घालून कारवाई केली आहे.या कारवाई मध्ये एकूण १ लाख ९६ हजार १३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून २३ गुन्हे दाखल करून २६ आरोपींना अटक करण्यात आले आहे.
हि कारवाई श्री.सागर धोमकर विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे यांच्या आदेशा नुसार श्री. प्रमोद सोनोने अहमदनगर अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्री.सुनील सहस्त्रबुद्धे, दुय्यम निरीक्षक के.टी.ढावरे,दुय्यम निरीक्षक एस.के.रासकर, दुय्यम निरीक्षक श्री.एस.आर. वाघ,स.दुय्यम निरीक्षक श्री. एस.बी.गुंजाळ,श्री.डी.एन. पवार,श्री.एस.आर.वराट, जवान कर्मचारी व वाहन चालक श्री.एस.एम.कासुळे यांनी केली आहे.