
अहमदनगर (दि.१७ एप्रिल):-नगर मनमाड रोडवरील गजराज नगर फाटा येथून मोटरसायकली चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.
घटनेतील फिर्यादी सागर सुरेश पाटोळे (रा.जेऊर बायजाबाई) यांची काळ रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी गजराज नगर फाटा येथील टाटा शोरूम येथून चोरीस गेली होती. सागर पाटोळे यांच्या फिर्यादी वरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरन ३६७/२०२४ भादवीक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास करत असताना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि/माणिक चौधरी यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा मधुकर बाबासाहेब ससे (रा. झापवाडी ता.नेवासा) याने केला आहे.
सपोनि/चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करून पोलिस अंमलदार यांनी आरोपीस शिताफीने पकडले.व त्याच्या ताब्यातून चोरलेली स्प्लेंडर मोटरसायकल जप्त केली. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहे/नंदकुमार सांगळे,पोहेकॉ/राजू सुद्रिक,विष्णू भागवत,किशोर जाधव,शाबीर शेख,नवनाथ दहिफळे, दक्षिण मोबाईल सेल पोकॉ/राहुल गुंडू यांनी केली आहे.