
अहमदनगर (दि.२० एप्रिल):-लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सत्ताधारी भाजपकडून ४०० पारचा नारा दिला जात आहे. मात्र चारशे पार तर सोडा हे साधे दोनशे पार देखील करू शकणार नाही अशी टीका आज कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रा समारोप प्रसंगी भाजपवर केली.
आ.रोहित पवार अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचा समारोप प्रसंगी बोलत होते.यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका करत लोकसभा निवडणुकीत भाजप दोनशे जागांवर देखील विजय होणार नसल्याचं म्हटले आहे.तर २०० ते २५० खासदार हे इंडिया आघाडीचे निवडून येणार आहे असा विश्वास यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केला.
अहमदनगर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचा समारोप आज होता.याप्रसंगी राष्ट्रवादीचे खा.शरद पवार,आ.आदित्य ठाकरे,आ.बाळासाहेब थोरात,आ.रोहित पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,अभिषेक कळमकर यांच्यासह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे नेते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी मंचावरून भाषण करताना रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला,लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून भाजपकडून देशभरात चारशे पारचा नारा दिला जातो आहे.रोहित पवार म्हणाले भाजपाला चारशे पार तर सोडा दोनशे ही जागा मिळणार नाही.तसेच तुतारी चिन्ह घराघरात पोहोचवा व नगर दक्षिणेचे उमेदवार निलेश लंके यांना साथ द्या असे आवाहन यावेळी आ.रोहित पवार यांनी नागरिकांना केले.यावेळी सभेला शहरातील गांधी मैदान येथे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.