अहमदनगर प्रतिनिधी (दि.६.जानेवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात कांबी येथे अवैध वाळु वाहतुकी विरुध्द कारवाई करुन दोन ढंपर व चार (04) ब्रास वाळु असा 20,40,000/- रु. (वीस लाख चाळीस हजार) किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे.बातमीची हकिगत अशी की,श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक यांनी पोनि/श्री. अनिल कटके यांना जिल्ह्यातील अवैध वाळु वाहतुकी विरुध्द कारवाई करणे बाबतचे आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील विविध पथके तयार केली होती पैकी पथकातील सफौ/मनोहर शेजवळ,पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे,संदीप घोडके,पोना/शंकर चौधरी, पोना/सचिन आडबल,पोना/ज्ञानेश्वर शिंदे,संतोष लोढे व पोकॉ/शिवाजी ढाकणे असे शेवगांव तालुक्यात अवैध वाळु उत्खनन व वाहतुकी विरुध्द कारवाई करणे करीता पेट्रोलिंग करत असतांना पोनि/श्री.अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,दोन इसम कांबी ते हातगांव रोडने दोन राखाडी रंगाचे ढंपरमधुन अवैधरित्या वाळु भरुन चोरी करुन वाहतुक करत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाली.पोनि/अनिल कटके यांनी नमुद माहिती लागलीच पथकास कळवुन पंचांना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.नमुद सुचना प्रमाणे पथकातील पोलीस अंमलदार यांनी पंचांसह कांबी ते हातगांव रोडने जावुन पाण्याच्या पाटालगत सापळा लावुन थांबलेले असतांना दोन राखाडी रंगाचे ढंपर येताना दिसले पथकाची खात्री होताच त्यांना बॅटरीचे सहाय्याने थांबण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन थांबविले त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन वाहनाची पाहणी करता त्यामध्ये वाळु असल्याची खात्री झाल्याने सदर चालकास वाळु वाहतुकीचे परवान्या बाबत विचारपुस केली असता त्याने त्याचेकडे शासनाचा वाळु वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.त्यामुळे पथकाने त्यास ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1)शैलेश रामदास सोनवणे (वय 22,रा. चापडगांव,ता.शेवगांव) असे सांगितले त्याचेकडे ढंपरचे मालकाबाबत विचारणा केली असता त्याने 2) पप्पु ऊर्फ पिवळ्या पातकळ,रा. चापडगांव,ता.शेवगांव) यांचे मालकिचा ढंपर असलेबाबत माहिती दिली.त्याचवेळी दुस-या ढंपरवरील चालकास ताब्यात घेण्याचे तयारीत असताना चालकाने ढंपर चालु करुन पळुन जावुन ढंपरमधील वाळु रोडने खाली केली व ढंपर मधुन उतरुन अंधाराचा फायदा घेवुन काटवनात पळुन गेला त्याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही.ताब्यातील आरोपीकडे सदर ढंपर चालाकचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव व गाव 3) विजय अशोक चेमटे रा.शिंगोरी,ता.शेवगांव असे असल्याचे सांगितले.ताब्यात घेतलेल्या आरोपीने अवैधरित्या शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता किंवा रॉयल्टी न भरता शासकिय मालकिची वाळु अवैधरित्या चोरी केल्याने 20,40,000/- (वीस लाख चाळीस हजार) रुपये किंमतीचा दोन ढंपर व चार (04) ब्रास वाळुसह ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. 7/2023 भादविक 379, 511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्रीमती.स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधिक्षक,श्रीरामपूर व श्री. संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधीकारी,श्रीरामपूर विभाग अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
Trending Topics:
Trending
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
- रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रची सुभेदारी विश्रामगृह येथे चिंतन बैठक संपन्न;संघटनात्मक बांधणीसह ऑक्टोबरमधील मेळाव्यावर भर!
- ‘त्या’ काळ्या स्कॉर्पिओवर पोलिसांचा छापा लाखोंची नामांकित दारू जप्त..अहिल्यानगर उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह?
