अहमदनगर प्रतिनिधी (दि.६.जानेवारी):-मा.खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांची पिपल्स रिपब्लिकन पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये महायुती झाली असता, शहरातील दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्यांनी एकत्र येऊन जल्लोष केला.मार्केटयार्ड चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन ढोल-ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरविले. यावेळी जोरदार घोषणांनी भिम शक्ती व शिव शक्तीचा गजर करण्यात आला.नगर शहरात आलेले पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या जल्लोशाप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शहराध्यक्ष दिलीप सातपुते, नगरसेवक सचिन जाधव, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, प्रा.जयंत गायकवाड,नितीन कसबेकर,सुनील क्षेत्रे,युवानेते सोमा शिंदे,संतोष मोकळ, मधुकर पावसे,संजय उनवणे, किरण जाधव,प्रा. भीमराव पगारे सर,महिला जिल्हाध्यक्षा गौतमी भिंगारदिवे,अक्षय बोरुडे,संघा गायकवाड, अमोल जाधव,आदर्श उघडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
Trending Topics:
Trending
- एमआयडीसी पोलिसांचा धमाका:हॉटेल ‘गुडलक’ मधील निर्घृण हत्याकांडाचा पर्दाफाश.. तिसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या गुन्ह्याची दिली कबुली..
- नागपंचमीत महिलांचे दागिने लांबवणारी टोळी गजाआड..LCB च्या धाडीत लाखोंचे सोने जप्त..!
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
