गुरुदत्त भक्तिधाम मंदिराच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त श्रीमदभागवत कथाज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन
नगर (प्रतिनिधी):-श्री.समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या कृपेने प.पू.प्रातःस्मरणीय गुरूवर्य ह.भ.प.भास्करगिरी महाराज व ह.भ.प.स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज श्री क्षेत्र देवगड यांच्या आशिर्वादाने,राजेंद्र कुचेकर यांच्या सौजन्याने पाईपलाईनरोड भिस्तबाग येथील संत किसनगिरी नगर येथे गुरुदत्त भक्तीधाम मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त श्रीमद भागवत कथाज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कथा प्रवक्त्या भागवताचार्या व रामायणाचार्या साध्वी प.पु.अनुराधा दिदी संस्थापक, दिव्यराधा सत्संग परिवार, पंढरपुर यांच्या मधुर वाणीतून संपन्न होत आहे.शनिवार दिनांक ४ मे रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत दीपप्रज्वलन व्यासपीठ पूजन भागवत महात्म्य,रविवारी ५ मे रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत प्रथम स्कंद कुंतीस्तुती,भीष्मस्तुती,परीक्षित शाप शुक्राचार्य आगमन,सोमवार दि.६ मे रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत द्वितीय स्कंध,तृतीय स्कंध,तृतीय स्कंध, कपिलोपदेश,चतुर्थ स्कंध, दत्तात्रय अवतार, मंगळवार दि.७ मे रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत दक्ष यज्ञ,जडभरत आख्यान,आजा मेळा चरित्र प्रल्हाद चरित्र,नृसिंह अवतार, बुधवार दि.८ मे रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत गजेंद्र चरित्र,वामन अवतार नवमस्कंद,कृष्ण जन्मोत्सव, गुरुवार दि.९ मे रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत बाललीला, दहीहंडी, शुक्रवार दि.१० मे रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत रासक्रीडा, मथुरागमन,कंसवध,विद्या अध्ययन, श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह, शनिवार दि.११ मे रोजी सकाळी ९ वाजता हभप स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड यांचे काल्याचे किर्तन होईल. काल्याच्या कीर्तनानंतर महाआरती नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी या भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा नगर भक्त मंडळाने केले आहे.