Maharashtra247

विजय औटींचा विखेंना पाठिंबा दिल्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नगर मध्ये पत्रकार परिषद घेत घेतला हा मोठा निर्णय

नगर प्रतिनिधी:-लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खा.डॉ.सुजय विखे यांना पाठींबा देण्याची घोषणा माजी आमदार विजयराव औटी यांच्यावर उलटली आहे.तालुकाप्रमुखांसह पाचही पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी नगर येथे पत्रकार परीषद घेउन आम्ही महाविकास आघाडीसोबतच असल्याचे स्पष्ट करून विजय औटी यांच्या निर्णयाशी आम्ही सहमत नसल्याची घोषणा पत्रकार परीषदेत केली.

दोन दिवसांपूर्वी औटी यांनी तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे, महिला आघाडीप्रमुख प्रियंका खिलारी,युवा सेना तालुका प्रमुख अनिल शेटे,ज्येष्ठ नेते मा. पंचायत समिती सदस्य डॉ.भास्कर शिरोळे, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांची बैठक घेतली.या बैठकीत सर्वांनी उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या उमेदवारास मदत करण्याची भुमिका मांडली.त्यानंतर औटी यांनी आपण दोन दिवसांत निर्णय जाहिर करू असे स्पष्ट केले होते.

बुधवारी रात्री औटी यांनी आपण सुजय विखे यांना पाठींबा देत असल्याचे सोशल मीडियावरून जाहिर केले. त्यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.औटी यांच्या निर्णयानंतर जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी तालुकाप्रमुखांसह इतर पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून गुरूवारी नगर येथे त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीनंतर आ. नीलेश लंके यांनीही सेना पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधला.या बैठकीस तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे, महिला आघाडीप्रमुख प्रियंका खिलारी, युवा सेनेचे तालुकाप्रमुख अनिल शेटे, डॉ.भास्करराव शिरोळे, डॉ.कोमल भंडारी, किसन सुपेकर, किसन चौधरी, गुलाबराव नवले, सखाराम उजागरे,बाबाजी तनपुरे, संतोष येवले, शिवाजी लाळगे, डॉ. रायचंद आढाव, अशोक सालके, संजय मते, सुभाष भोसले, रामदास खोसे, संतोष साबळे,रवी वाकळे,संतोष लामखडे, शांताराम पाडळे,शरद घोलप आदी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page