उत्कर्षा रूपवते यांच्या प्रचारार्थ कोपरगावात सुजात आंबेडकर यांची विजय संकल्प सभेचे आयोजन
संगमनेर (नितीन भालेराव):-शिर्डी लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून या मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे.आणि या मतदारसंघात वंचितचे पारडे विरोधी उमेदवारांपेक्षा जड दिसू लागले आहे.त्यातच शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या प्रचारार्थ कोपरगाव शहरात विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेसाठी सुजात आंबेडकर उपस्थित राहणार आहे.उत्कर्षा रुपवतेंच्या उमेदवारीने सर्वजन समाजासमोर एक सक्षम पर्याय निर्माण झाला आहे.श्रीरामपुरात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रचंड मोठी सभा झाली या सभेनंतर संगमनेरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अहमदनगर शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली.उद्धव ठाकरे श्रीरामपूरात भाऊसाहेब वाकचौरे साठी सभा घेणार आहेत व आता वंचित बहुजन आघाडी कडून कोपरगाव शहरांमध्ये विजय संकल्प सभेचे उत्कर्षा रूपवते त्यांच्या प्रचारार्थ आयोजन करण्यात आले आहे.
ही सभा कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर गुरुवार दि.9 मे रोजी संध्याकाळी 06:00 वाजता संपन्न होणार या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात आले आहे.