Maharashtra247

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची  श्रीगोंद्यात मोठी कारवाई

अहमदनगर (दि.९ मे):-सध्या अहमदनगर व शिर्डी मतदार संघात निवडणुकीचे वातावरण चांगले तापले आहे यामध्ये नागरिकांना ओल्या पार्ट्यां देण्याचे प्रमाण वाढले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक १ यांनी श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज शिवारात गोवाराज्य निर्मित व महाराष्ट्रात विक्री करण्यास प्रतिबंधित असलेल्या विदेशी दारू विक्री करणाऱ्यास पकडुन दि.७ मे रोजी मोठी कारवाई केली आहे.यात उमेश दिगंबर गवळी रा.अजनुज ता श्रीगोंदा,बाळु रानबा गोडसे रा.टाकळी लोणार ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर या दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत एकूण २ लाख ३६ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री.प्रमोद सोनोने,उपाधीक्षक श्री. प्रवीण कुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्रमांक १ निरीक्षक श्री सुरज कुसळे,दुय्यम निरीक्षक आनंद जावळे,सहाय्यक दुय्यम निरिक्षक व्ही.एन. रानमळकर,सर्वश्री जवान प्रविण साळवे,अविनाश कांबळे,महिला जवान शुभांगी आठरे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page