पुढील चार दिवस जागृकतेने काम करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे;खा.सुजय विखे पाटील आणि आपल्या सारखे कार्यकर्ते लोकांसाठी अहोरात्र सेवा करीत होते परंतू त्याचे प्रदर्शन आम्ही कधी केले नाही-बावनकुळे
नगर (दि.७ प्रतिनिधी):-अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या निवडणूकीच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेवून पुढील चार दिवस जागृकतेने काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी बावनकुळे म्हणाले की,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईवर झालेल्या हल्ल्याबाबत केलेले वक्तव्य शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांना मान्य आहे का असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.कसाबच्या कुटूंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी वडेट्टीवारांनी घ्यावी असा टोलाही त्यांनी लगावला.
तसेच मतदाना पर्यंतच्या नियोजनाच्या सुचनाही त्यांनी दिल्या.याप्रसंगी खा.संजय काका पाटील, मा.आ.आशिष देशमुख, मा.खा.विकास महात्मे, आ.मोनीका राजळे, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग,शहर अध्यक्ष अभय अगरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या भाषण आ.बावनकुळे म्हणाले की,यंदाची लोकसभेची निवडणूक ही २०४७ पर्यंतच्या विकसीत भारतासाठीची निवडणूक आहे.आपले प्रत्येक मत हे देशामध्ये तीन कोटी लखपती दीदी बनविणार आहे.चार लोकांना घर देणार आहे, सुर्य घर निर्माण करणार आहे. आणि १३ तारखेची निवडणूक वन नेशन वन इलेक्शन आणि समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सुध्दा खुप महत्वपूर्ण आहे.त्यामुळे या निवडणूकीत देशातील पुर्ण जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.नगर येथे येवून प्रधानमंत्र्यांनी आपल्याला नमस्कार केला असल्याने विकसीत भारताच्या मतदानाची अहुती शंभर टक्के मतदान घडवून आपण द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे संकल्प पत्र प्रत्येक घरी जावून द्यावे असे सुचित करुन, प्रधानमंत्री समर्पित भावनेने देशासाठी काम करीत आहेत.मागील दहा वर्षे दिवाळीचा सण सुध्दा सैनिकांसोबत जावून ते साजरा करतात.कोव्हीड संकटातही देशातील नागरीकांची त्यांनी सेवा केली.मात्र दुसरीकडे देशावर संकट आणि आपत्ती आली की,राहुल गांधी परदेशात पळून जातात.अशी टिका करुन,कॉंग्रेसचे नेते आता अफजल कसाबची बाजू घेवून बोलू लागले आहेत.वडेट्टीवर यांनी केलेले वक्तव्य हा शहीद झालेल्या जवानांचा अपमान आहे.
एवढेच जर वडेट्टीवारांना पाकीस्तानचे प्रेम असेल तर त्यांनी कसाबच्या कुटूंबियांचे पालन पोषण करण्याची जबाबदारी घ्यावी असा टोला लगावून त्यांच्या वक्तव्याबाबत शरद पवार आणि उध्दव ठाकरे अद्यापही बोलायला तयार नाहीत उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना केवळ दोन दिवस विधीमंडळात आले.त्यांनी हातात कधी पेन घेतल्याचा आपण पाहीले नाही. कोव्हीड संकटातही फेसबुकवर दिसणारे उध्दव ठाकरे गरम पाणी पेऊन झोपून घ्या असा सल्ला जनतेला देत होते. दुसरीकडे मात्र मोदीजींनी केलेल्या आवाहानाला प्रतिसाद देवून खा.सुजय विखे पाटील आणि आपल्या सारखे कार्यकर्ते लोकांसाठी सेवा करीत होते. परंतू त्याचे प्रदर्शन आम्ही कधी केले नाही.
डॉ.सुजय विखे पाटील यांचा विजय हा मोदीजींचा विजय आहे. देशाच्या विकास प्रक्रीयेला साथ देण्यासाठीच अजीत पवारही आता या महायुतीत सहभागी झाले आहेत. विकसीत भारताच्या संकल्पनेला प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने पुढील चार दिवस मोदीजींचा पाठबळ देण्यासाठी द्यावे असे आवाहन तयांनी शेवटी केले. याप्रसंगी दिलीप भालसिंग,अभय आगरकर यांची भाषण झाली.