ओबीसी बहुजन पार्टीचे लोकसभेचे उमेदवार गोरख आळेकर यांनी प्रस्थापितांवर डागली तोफ
अहमदनगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर दक्षिणमधून लोकसभा ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने गोरख दशरथ आळेकर हे निवडणूक लढवत असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आज सायंकाळी पाच वाजता त्यांच्या प्रचाराची सांगता झाली.
यावेळी पत्रकार परिषदेत उमेदवार गोरख दशरथ आळेकर म्हणाले की,ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय नेते माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे,डीपी मुंडे साहेब,तांडेल साहेब,बावकर साहेब आणि आव्हाड साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ओबीसी बहुजन पार्टीची उमेदवारी दिली तरी सर्व ओबीसी बांधवा हे मला मतदान करतील अशी अपेक्षा आहे.ओबीसी समाजावर गेल्या काही दिवसापासून अन्याय आणि अत्याचार चालू आहे ते थांबण्यासाठी आणि ओबीसी समाज भारत स्वतंत्र झाल्यापासून प्रस्थापितांचा गुलाम आहे या गुलामीतून मुक्त करण्यासाठी मी ही उमेदवारी करत आहे.
तसेच शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न विजेचा प्रश्न आणि रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शेतीमालाला भाव मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.ओबीसी समाजातील विलास कृष्णा क्षिरसागर तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील अपंग मुलाचा खून करून त्याची आत्महत्या आहे असं बनावट चित्र समाजासमोर आणलं. त्याच बरोबर ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे यांच्या गाडीवर शाही फेकली तसेच पंकजाताई मुंडे यांना प्रचार करताना गावोगावी त्यांना अपमानास्पदक वागणूक देण्यात आली त्याच बरोबर बीड जिल्ह्यातील सुभाष राऊत यांचे थ्री स्टार हॉटेल जाळण्यात आले.
तसेच आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर जाळण्यात आले. दुधळे यांचे हॉटेल जाळण्यात आले आमचे सोनार बांधवांचं सोन्याचे दुकान जाळण्यात आले.फलटण येथे डॉ. बीके यादव यांच्या हॉस्पिटलचे नुकसान करण्यात आले.ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांच्यावर झेरॉक्स मशीनची शाही फेकली त्याने त्यांची 80 टक्के दृष्टी गेली.तसेच सोलापूर जिल्ह्यातील गेस्ट हाउस मध्ये आमचे धनगर बांधव आरक्षणाच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी गेले असता त्यांनी पालकमंत्र्याच्या अंगावर भंडारा उधाळा याचा राग मनात येऊन पालकमंत्री यांच्या कार्यकर्त्यांनी आणि बॉडीगार्डने आमच्या धनगर बांधवाला गुराढोरासारखं मारलं याची व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात आजही फिरत आहे.
ओबीसी हृदयसम्राट छगनरावजी भुजबळ नाशिक मधून लोकसभा लढवण्यास इच्छुक होते त्यांना गावोगावी विरोध केला व त्यांना उमेदवारी पासून वंचित ठेवण्यात आले.या लोकसभेमध्ये ओबीसी समाजाने प्रतिनिधित्व करावे की नाही आमची मते तुम्हाला चालतात परंतु आम्हाला प्रतिनिधित्व द्यायची वेळ आली की प्रस्थापित आम्हाला संधी देत नाही म्हणूनच ओबीसी बहुजन पार्टीची स्थापना करण्यात आली आहे जेणेकरून विस्थापितांना राजकारणात संधी देण्याचे काम हा पक्ष करेल.सर्व ओबीसी समाज हा ओबीसी म्हणून माझ्याकडे एका आशेने पाहत आहे तरी काही जाणीवपूर्वक ओबीसी बहुजन पार्टीचा उमेदवार मीच आहे अशा वावड्या उठवत आहे अशा बावड्या उठवणाऱ्याला ओबीसी समाज चांगला ओळखून आहे त्यामुळे ओबीसी समाज मला या निवडणुकीत मताधिक्य देईल आणि अहिल्यानगरचा प्रथम ओबीसी समाजाचा खासदार म्हणून मला संधी देणार यात शंकाच नाही तरी 13 तारखेला मला मतदान करून भरगच्च मताने विजयी करा असे आवाहन गोरख आळेकर यांनी केले.