रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल कडून सामाजिक कार्यकर्त्या उज्वला पारधे यांचा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त सन्मान
अहमदनगर (दि.१२ मे):-रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल आयोजित अहमदनगर येथे आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिन साजरा करण्यात आला.यामध्ये जिल्ह्यातील वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या पारिचारिकांचा ११ मे रोजी सन्मान करण्यात आला.स्वास्थ सेवा,स्वास्थ जागरूकता आणि दुसऱ्यांची सेवा व पेशंट साठी उत्कृष्ट योगदान या साठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
त्यातच नगर शहरातील केडगाव उपनगरातील आरोग्यदूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारिचारिका उज्वला पारधे यांचा रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल कडून प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.उज्वला पारधे यांचे नगर शहरामध्ये आरोग्या बाबतीत व तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता कमिटी सदस्य या माध्यमातून समाजिक कार्या बाबतीत मोठे योगदान आहे त्याचीच पावती म्हणून पारिचारीका दिनाच्या दिवशी त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी अध्यक्ष हरीश एल.नायर,सेक्रेटरी Rtn.Dr.कुणाल कोल्हे, जिल्हा राज्यपाल Rtn.स्वाती हरकल इ. उपस्थित होते.
१२ मे पारिचारिका दिन
परिचारिकेने रुग्णाची सेवा करणे,त्याच्या सामाजिक व आध्यात्मिक परिसराची तो रोगमुक्त होण्यास योग्य अशी परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी घेणे,तसेच आरोग्य शिक्षणाने व स्वत:च्या उदाहरणाने आजार टाळणे आणि प्रकृतिस्वास्थ्य टिकविण्याचे महत्त्व पटविणे ही कार्ये करतात.
परिचारिका कोणत्या भूमिकेत काम करतात?
परिचारिका प्रत्येक समुदायात आहेत मोठ्या आणि लहान जन्मापासून ते आयुष्याच्या शेवटपर्यंत तज्ञ काळजी प्रदान करतात. परिचारिकांची भूमिका थेट रुग्णाची काळजी आणि केस मॅनेजमेंटपासून नर्सिंग सराव मानके स्थापित करणे,गुणवत्ता आश्वासन प्रक्रिया विकसित करणे आणि जटिल नर्सिंग केअर सिस्टम निर्देशित करणे यापर्यंत असते.