मंगलगेट येथे दोन गटात तुफान राडा
अहमदनगर (दि.१२ मे):-अहमदनगर शहरातील मंगलगेट येथील कोंड्या मामा चौकात दोन गटात नुकताच तुफान राडा झाला आहे.लोकसभेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटनेने नागरिक भयभीत झाले आहे.
यामध्ये शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन जाधव यांचे कार्यालय व तसेच वर्चस्व ग्रुपचे कार्यालय यावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली.या दोन्ही कार्यालयासमोर दगडांचे खच व लाकडी दांडके पडलेले होते. दोन्ही गटांकडून समोरासमोर दगडफेक झाली असल्याची माहिती समजतेय.यामध्ये चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.परंतु वादाचे कारण आद्यापही समजले नाही.