लोकशाहीच्या उत्सवास सुरवात निलेश लंकें व सुजय विखे यांनी बजावला मतदानाचा हक्क
अहमदनगर (दि.१३ मे):-अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी आपल्या हांगे या गावात आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
मतदानानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतले आहे त्यामुळे आपल्या विजयावर शिक्कामोर्तब झाले,असा विश्वास नीलेश लंके यांनी व्यक्त केला.
तसेच महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी लोणी बुद्रुक येथील पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर विद्यालयात विखे पाटील परीवाराने आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुजय विखे म्हणाले की आपला विजय निश्चित आहे लोकांसमोर आपण विकासाने निवडणुकीला सामोरे गेलो आहे.