अहमदनगर लोकसभा मतदार संघात अंदाजे सरासरी एकुण ६१ टक्के तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ६२ टक्के मतदान
अहमदनगर (दि.१३ मे):-लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या चौथ्या टप्प्यात ३७- अहमदनगर व ३८-शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी सोमवार दि.१३ मे रोजी मतदान सुरळीतपणे पार पडले.
३७-अहमदनगर लोकसभा मतदार संघात अंदाजे सरासरी एकूण ६१ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली तर ३८-शिर्डी लोकसभा मतदार संघात अंदाजे सरासरी ६२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे मतदाराने ईव्हीएमवरील मतदानाचे चित्रीकरण केल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला तर निळया रंगाच्या शाईची बाटली घेऊन अवैधरित्या शाई लावणाऱ्या व्यक्तीवर भिंगार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निवडणुकी दरम्यान अशा किरकोळ घटना वगळता अहमदनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान शांततेत पार पडले असल्याची माहितीही यावेळी दिली.