Maharashtra247

पाईपलाईनरोड येथील शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी राजे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अहमदनगर (दि.१४ मे):-पाईपलाईन रोड येथील कै.शंकर भाऊ वाणी चौकात शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संभाजी महाराज यांचे कार्य सांगितले.

यावेळी आ.जगताप म्हणाले की छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (१४ मे १६५७-११ मार्च १६८९) हे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले पुत्र होते.तसेच छत्रपती संभाजीराजे हे बुद्धिप्रामाण्यवादी होते.शेवटच्या क्षणापर्यंत रयतेच्या स्वराज्यासाठी ते लढत होते.अर्ध्या आशिया खंडावर सत्ता असणार्‍या औरंगजेब बादशहाला सह्याद्रीमध्ये जखडून ठेवण्याचे आणि त्याला हतबल करण्याचे महान कार्य संभाजीराजांनी केले.

त्यामुळे त्यांचा इतिहास आजही आजरामर आहे असे ते म्हणाले.यावेळी शंभुराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश वाणी,बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक अमोल गागरे,मा.नगरसेवक सागर बोरुडे,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर,राजेंद्र तागड,तुषार यादव,संतोष वाणी,शेखर तुंगार,संदीप मस्के, संतोष लांडे,संतोष भिंगारदिवे,प्रशांत शिंदे,बहिरू वाकळे,भैय्या पवार, राजेंद्र मोकाशी,संदीप थोरात,गोपाल गोरे,भैय्या साळुंके,योगेश वागस्कर,तुषार डफळ,उद्धव चींधे व शंभुराजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page