Maharashtra247

हिवरगाव पावसा येथे मतदारांचा उत्स्पुर्त प्रतिसाद ७४ टक्के मतदान 

संगमनेर (नितीन भालेराव):-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे शिर्डी लोकसभा मतदार संघातील निवडणूकीत मतदारांनी उत्स्पुर्तपणे मतदान केले.मतदारांनी हिवरगाव पावसा मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या.तीन बूथवर दिवसभरात ७४ टक्के मतदान झाले.सकाळी ७ वाजता मतदान सुरळीतपणे सुरु झाले.सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत मतदान केंद्रात गर्दी नव्हती.परंतु सकाळी ९ वा.नंतर मतदारांचा उत्स्पुर्त प्रतिसाद दिसून आला.

दिवसभरात एकूण २०६३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.मतदान करण्यासाठी महिलांन मध्ये मोठा उत्साह दिसून आला.हिवरगाव पावसा येथे शिर्डी लोकसभा मतदार संघातील निवडणूकीसाठी एकूण तीन बूथवर मतदान घेण्यात आले.कडक उन्हातही मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.महिला पुरुषांन बरोबर युवा मतदार उत्स्पुर्तपणे मतदान करताना दिसत होते.

मतदार आपले नाव मतदार यादी शोधण्यासाठी कॉंग्रेस,भाजप,वंचितच्या बुथवर गर्दी करत होते.वंचितच्या केडर बेस कार्यकर्त्यांच्या सुयोग्य नियोजनामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याचे दिसून आले.हिवरगाव पावसा येथील बौध्द,मुस्लीम,मराठा,ओबीसी मतदारांमध्ये वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांना मोठा प्रतिसाद दिसून आला.तर भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी महाविकास आघाडी आणि सदाशिव लोखंडे यांच्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते मताधिक्य मिळविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होते.संपूर्ण मतदान शांततेत आणि सुरळीतपणे झाले.

You cannot copy content of this page