Maharashtra247

दरोड्याच्या तयारीत असलेल्या रेकॉर्डवरील ४ आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या मुसक्या

अहमदनगर (दि.२५ मे):-अहमदनगर परिसरातील लिंकरोड येथे दरोड्याच्या तयारीत असलेले ४ रेकॉर्डवरील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.बातमीची हकिगत अशी की,जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील मालाविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे ना उघड गुन्हे उघडकिस आणणे बाबत व गुन्ह्यांना आवश्यक ते प्रतिबंध करणेबाबत आदेशित केले होते.

नमुद आदेशान्वये पोनि/श्री. आहेर यांनी यांचे पथक नेमुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.

सदर सुचना प्रमाणे पथक अहमदनगर जिल्ह्यातील चोरीचे गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना पोनि/श्री.दिनेश आहेर यांना रोजी गुप्तबातमीदारा मार्फत, इसम नामे ओसवाल इंपिरियल चव्हाण (रा.वाळुंज पारगांव,ता.जि. अहमदनगर) हा त्याचे 04 ते 05 साथीदारांसह दोन मोटारसायकलवर येवुन कल्याण रोड ते केडगांव जाणारे लिंक रोडजवळ गायके मळ्याकडे जाणारे रोडला असलेल्या ओढ्या लगत अंधारामध्ये थांबुन कोठेतरी दरोडा घालण्याचे तयारीत थांबलेले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना दिल्या. पथकाने लागलीच बातमीतील ठिकाणी कल्याण रोड ते केडगांव जाणारे लिंक रोड जवळ गायके मळ्याकडे जाणारे रोडला असलेल्या ओढ्यालगत जावुन खात्री करता अंधारात रोडचे कडेला,काही संशयीत इसम दबा धरुन बसलेले दिसले.

पथकाची खात्री होताच संशयीतांना पकडण्याचे तयारीत असतांना, संशयीतांना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते पळुन जावु लागले.पथकाने त्यांचा पाठलाग करुन शिताफीने 04 इसमांना ताब्यात घेतले.त्यावेळी तेथुन 02 इसम अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले.ताब्यात घेतलेल्या संशयीतांची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडती व कब्जात 1 तलवार, 1 सुरा, 01 लोखंडी कटावणी,मिरचीपुड, दोन महागडे मोबाईल, दोन मोटारसायकल असा एकुण 2,12,900/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द पोहेकॉ/440 संदीप कचरु पवार नेम -स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 622/2024 भादविक 399,402 सह आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार बबन मखरे,दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, बापुसाहेब फोलाणे, रविंद्र कर्डीले,गणेश भिंगारदे,संदीप दरंदले, संतोष खैरे,विजय ठोंबरे, रविंद्र घुंगासे,रोहित मिसाळ,मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page