Maharashtra247

एमआयडीसी मधील बालगृहातील मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू संस्थेचे अध्यक्ष व अधीक्षका विरुद्ध एमआयडीसीत गुन्हा दाखल

अहमदनगर (दि.२३ मे):-एमआयडीसी परिसरातील आठरे पाटील ग्रामनवोदय ट्रस्ट संचलित शैक्षणिक बालगृहात सोमवार दि.२० मे रोजी सकाळी ९ वा.सुमारास साईराज गणेश बाबरे या मुलाचा शॉक लागल्याने मृत्यू झाला होता.

याबाबत त्या मुलाची आईने बुधवार दि.२२ मे रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या फिर्यादीवरून ट्रस्टचे अध्यक्ष अनिल आठरे,बालगृहाच्या अधीक्षक पुष्पांजली बाळासाहेब थोरात,या दोघां विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात भांदविक ३०३ (अ),३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येथील बालगृहाच्या बाहेरील बाजूस जीर्ण झालेल्या विजेच्या केबल व वायर मुळे बालगृहात असलेल्या मुलांचा शोक बसून मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असतानाही निष्काळजीपणाने या बालगृहाच्या इमारतीच्या विजेच्या तारेची देखभाल न ठेवता तसेच ती उघडी ठेवली.

त्या तारेला हात लागून मुलाचा मृत्यू झाला असल्याने त्यास अध्यक्ष व कारागृह अधीक्षकच जबाबदार आहेत असं मृत मुलाच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनी/माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/परदेशी हे करीत आहे.

You cannot copy content of this page