Maharashtra247

पत्रकार चौक ते प्रेमदान चौक रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्यावरील अतिक्रमणे त्वरित हटवावी अन्यथा रस्ता रोको करणार-चंद्रकांत (काका) शेळके

अहमदनगर (दि.२९ मे):-नगर शहरातील रहदारीला मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या पत्रकार चौक ते प्रेमदान चौक या रस्त्यावरील असलेले मोठे धोकादायक खड्डे व याच रस्त्यावरील अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावी यासाठी शिवसेना सावेडी विभाग प्रमुख श्री. चंद्रकांत काका शेळके यांनी जागतिक बँक प्रकल्प विभागाचे अभियंता यांना दि.२९ मे रोजी निवेदन दिले आहे.

दिलेल्या निवेदनात शेळके यांनी म्हटले आहे की,आपल्या कार्यक्षेत्रातील नगर शहरातील अत्यंत रहदारीच्या पत्रकार चौक ते प्रेमदान चौक या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे.यामुळे रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना त्रास होत असून अपघातांचे प्रमाण देखील वाढलेले आहे.या खड्ड्यांमुळे लोकांना आपले प्राण गमावावा लागलेले आहे व कायम स्वरूपाचे अपंगत्व ही आलेले आहे.आणि या रस्त्यावर छोटे मोठे अतिक्रमण वाढलेले आहे यामुळे रस्त्यालगत गाडी पार्क करणे ही अवघड झाले आहे.म्हणजेच या रस्त्यावरील वाहतुकीचा श्वास गुदमरला आहे.

तरी आपण या सर्व बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून रोडवरील खड्डे बुजवून व अतिक्रमण काढून लोकांना रहदारीसाठी हा मार्ग मोकळा करून द्यावा.ही कारवाई १५ दिवसाच्या आत झाली नाही तर शिवसेनेच्या वतीने हायवेवर रस्ता रोको केला जाणार व या आंदोलना दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास याची संपूर्ण जबाबदारी आपली राहील असे काका शेळके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.यावेळी अनिकेत कराळे, प्रा.विशाल शितोळे,मयूर गायकवाड,रवींद्र राऊत, अमोल बगाडे,तुषार यादव,अनिकेत ओझा इ. उपस्थित होते.

You cannot copy content of this page