राज्य उत्पादन शुल्क विभागाची गावठी हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर कारवाई तब्बल ८ लाखांची दारू नष्ट तर १३ जणांवर गुन्हे दाखल
श्रीरामपूर (प्रतिनिधी):-राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.२ श्रीरामपुर यांनी गोंधवनी,श्रीरामपुर व देवळालीप्रवरा ता.राहुरी या ठिकाणी हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रांवर दि.३० मे रोजी छापा टाकत अवैध दारू नष्ट केली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.२ श्रीरामपूरचे निरीक्षक श्री.अनुपकुमार देशमाने यांनी दिली.
या कारवाईत एकूण १३ गुन्हे नोंद करण्यात आले असून ५६९ ली.हातभट्टी गावठीदारू व १८,५१५ ली रसायन नष्ट करण्यात आले.या मुद्देमालाची एकूण किमत ८ लाख ४१ हजार ६०५/-रु.इतकी आहे. १३ आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कारवाई श्री.डॉ.विजय सूर्यवंशी, आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क,म.रा मुंबई,श्री. सागर धोमकर विभागीय उपआयुक्त पुणे विभाग पुणे,श्री.प्रमोद सोनोने,अधीक्षक,अहमदनगर, श्री.प्रवीणकमार तेली,उपअधीक्षक,अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली श्री.अनुपकुमार देशमाने, निरीक्षक,भरारी पथक क्र.२ श्रीरामपुर,श्री.एस. के.सहस्रबुद्धे निरीक्षक, संगमनेर विभाग,श्री. संजय हांडे निरीक्षक कोपरगाव विभाग,श्री. संजय जाधव निरीक्षक श्रीरामपुर विभाग,दुय्यम निरीक्षक श्री.निलेश पालवे,श्री.चंद्रकांत रासकर,श्री.रायचंद गायकवाड,श्री.प्रशांत पाटील,श्री.कृष्णा सुळे, श्री.आर.ए.घोरपड़े तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस.आर.वाघ, बी.ई.भोर,जवान सर्वश्री तासिफ शेख,श्रीमती स्वाती फटांगरे,श्री. सचिन गुंजाळ,अनिल मेंगाळ,शुभम लवांडे, अमीन सय्यद,महिला जवान श्रीमती वर्षा जाधव,श्रीमती सरस्वती वराट,श्रीमती रत्नमाला काळपहाड तसेच जवान नि वाहन चालक श्री. संपत बीटके,सुशांत कासुळे यांनी केली आहे.
अवैध हातभट्टी गावठी दारू निरमिती,वाहतूक, विक्री ठिकाणी व अवैध ढाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती श्री. अनुपकुमार देशमाने निरोक्षक,राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.२ श्रीरामपुर यांनी दिली आहे.