स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ११ लाख ७० हजार रुपये किमतीच्या मोटारसायकली हस्तगत
अहमदनगर (दि.३० मे):-५ बुलेट मोटारसायकलसह एकुण १० मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीस पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून ११ लाख ७० हजार रुपये किमतीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या.बातमीची हकिगत अशी की,जिल्ह्यामध्ये मोटारसायकल चोरीच्या वारंवार घटना घडत असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. दिनेश आहेर यांना अहमदनगर जिल्ह्यातील मोटारसायकल चोरी करणारे आरोपींची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.सदर सुचना प्रमाणे पथक अहमदनगर जिल्ह्यामधील मोटारसायकल चोरी करणारे आरोपींची माहिती काढत असतांना दि.३० मे रोजी पोनि.श्री. दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत तीन इसम चोरीचे विनानंबरचे एच.एफ.डिलक्स मोटारसायकलवरुन श्रीगोंदा बायपास येथे येणार असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पोनि.श्री.दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन कारवाई करणेबात सुचना दिल्या होत्या.सदर सुचनांप्रमाणे पथकाने तात्काळ श्रीगोंदा बायपास या ठिकाणी सापळा लावुन थांबले असता बातमीतील नमुद इसम एका विनानंबरचे एच.एफ.डिलक्स मोटारसायकलवरुन येतांना दिसल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे अनिल मोतीराम आल्हाट रा.श्रीगोंदा,हर्षद किरण ताम्हाणे रा.श्रीगोंदा, निखील उद्धव घोडके रा.श्रीगोंदा जि.अहमदनगर असे असल्याचे सांगितले.
त्यांचे कडे मिळुन आलेल्या विनानंबरचे मोटारसायकलबाबत त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांनी सदरची मोटारसायकल चोरी करुन आणलेली असल्याचे सांगितले. त्यानुसार ताब्यातील आरोपींकडे त्यांनी आणखी इतर मोटारसायकल चोरी केल्या आहेत काय याबाबत तपास करता त्यांचे कडुन ११ लाख ७० हजार रुपये किमतीच्या 10 मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. पकडलेल्या आरोपींना तपासकामी तोफखाना पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे हे करीत आहेत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, रविंद्र कर्डीले,फुरकान शेख, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, आकाश काळे,विशाल तनपुरे,अमोल कोतकर, संतोष खैरे,उमाकांत गावडे,संभाजी कोतकर यांनी केलेली आहे.