‘या’ पोलीस ठाण्यातील हेडकॉन्स्टेबल लटकला लाचेच्या सापळ्यात
अहमदनगर (दि.३१ मे):-अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारी अर्जाच्या चौकशीवरून कारवाई न करण्यासाठी ५ ते १० हजारांची लाच मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
यात शेवगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी पांडुरंग वीर असे लाचलुचपतच्या जाळ्यात अडकलेल्या पोलिसाचे नाव आहे.श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील इसमाने त्याची अहमदनगर लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार केली होती.