Maharashtra247

जामखेडमध्ये व्यापाऱ्यावर दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

जामखेड (प्रतिनिधी):-अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात एका व्यापाराच्या पीकअपने रिक्षाला धडक दिल्याने अपघात झाला होता.या अपघातातील जखमींना नुकसान भरपाई पोटी मोठी रक्कम काही लोकांनी मागितली होती.

ती देण्यास हल्ल्यात जखमी झालेले व्यापारी नितीन बाफना यांनी नकार दिला.अपघातातील जखमीच्या इलाजाचा खर्च आम्ही करू,मात्र तुम्ही सांगत असलेली मोठी रक्कम देणार नाही,असे बाफना यांनी सांगिेतले असता त्या आरोपींना राग येऊन बाफना यांना त्यांच्या दुकानात घुसून बेदम मारहाण करण्यात आली यात ते गंभीर जखमी झाले असून खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

या सर्व प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रीकरण झाले आहे. या प्रकरणी व्यापारी बाफना यांनी सात हल्लेखोरां विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जामखेड पोलीस करत आहेत.

You cannot copy content of this page