Maharashtra247

वाडियापार्क जलतरण तलावात एकाचा पोहताना मृत्यू;वाडियापार्क जलतरण पुन्हा चर्चेत

नगर (प्रतिनिधी):-अहमदनगर शहरातील वाडियापार्क येथे असलेल्या जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज रविवार दि.२ जुन रोजी सकाळी घडली आहे.

सागर प्रकाश कळसकर हे पोहण्यासाठी जलतरण तलावात गेले मात्र त्यांना अचानक चक्कर आल्याने त्यांचा या तलावात बुडून मृत्यू झाला आहे.त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सागर कळसकर हे राजस्थान बॉर्डरवर असलेल्या बाडमेर येथे BSF मध्ये कार्यरत होते.

३१ जानेवारी रोजी ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांना सुरुवातीपासून पोहण्याचा छंद होता. सेवानिवृत्त झाल्यानंतर नगरला आल्यावर ते वाडियापर्क येथे पोहण्यासाठी गेले असता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

You cannot copy content of this page