शहरातील अवैध धंद्यांवर कोतवाली पोलिसांची धडक कारवाई
अहमदनगर (दि.२ प्रतिनिधी):-अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांच्या आदेशाने कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर कोतवाली पोलिसांनी छापे टाकून आरोपींना अटक करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केला आहे.ही कारवाई रविवार दि.२ जुलै रोजी केली आहे.
शहरातील कायनेटिक चौक व भाजीपाला मार्केट यार्ड येथील २ ठिकाणचे गावठी हातभट्टी अड्डे उध्वस्त करून २ आरोपी ताब्यात घेतले.तसेच पांचपीर चावडी,पुणे बसस्थानक व केडगाव येथील मटका जुगार अड्ड्यावर ३ ठिकाणी छापे टाकून ३ आरोपी ताब्यात घेऊन एकूण १९ हजार ९८० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सुचनेनुसार गुन्हे शोध पथकातील दिपक रोहोकले,सत्यम शिंदे,तानाजी पवार,सचिन लोळगे,सुरज कदम,सुजय हिवाळे, संदीप पितळे,अहमद इनामदार,अतुल काजळे,अविनाश वाघचौरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल संगीता बडे आदींच्या पथकाने कारवाई केली.