
नाशिक (दि.३ जून):-नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर हे शनिवारी दि.१ जुन रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.त्यामुळे त्यांच्या रिक्त जागी दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दत्तात्रय कराळे यांची जानेवारी महिन्यात नाशिकमध्ये बदली झाल्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डॉ.बी.जी.शेखर यांनी मार्चमध्ये पुन्हा पदभार स्वीकारला होता.
मात्र, डॉ.शेखर यांच्या सेवानिवृत्तीनंतर पुन्हा कराळे यांच्याकडे नाशिक परिक्षेत्राचा पदभार आला आहे.एक खमक्या पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.