
अहमदनगर (दि.३ प्रतिनिधी):-लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ ची मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ नागापुर एम.आय.डी.सी.अहमदनगर येथे दि.०४ मे २०२४ रोजी ३७ अहमदनगर व ३८ शिर्डी या मतदार संघाची मतमोजणी होणार आहे.
सदर मतमोजणी ठिकाणी मतमोजणी कामी अधिकारी/कर्मचारी तसेच उमेदवार प्रतिनिधी व निकाल ऐकण्याकरिता मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व नागरीक उपस्थीत रहाण्याची शक्यता आहे.सदर मतमोजणी प्रक्रिया सुरळीत होणेकरीता तसेच निकाल ऐकण्याकरिता मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या कार्यकर्ते व नागरीकांचा वाहतुकीमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कार्यकर्ते व नागरीकांचे सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ नागापुर एम.आय.डी.सी. अहमदनगर येथे येण्या-जाण्याच्या मार्गावरील वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे अशी माझी खात्री झाली आहे.
त्याअर्थी मी राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर मला मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३(१) (ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन आदेशात नमुद केल्या प्रमाणे दि. ०४/०६/२०२४ रोजीचे ००.०१ ते २१.०० वा.पावेतो खालील नमुद मार्ग “नो व्हेईकल झोन (वाहन विरहीत क्षेत्र)” घोषीत केल्याचे आदेश जारी करीत आहे.
◀️साईरत्न हॉटेल चौक-एल अॅण्ड टी कॉलनी पारस कंपनी पर्यंत जाणरा रस्ता महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ लगतचे चारही बाजुचे रस्ते
प्रस्तुत आदेश परवानगी दिलेले शासकीय वाहने, संरक्षण विभागाची वाहने,स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेली वाहने यांना लागू राहणार नाही.प्रस्तुतचा आदेश आज दि.०३/०६/२०२४ रोजी माझे सही शिक्यानिशी दिला आहे.
१)जिल्हाधिकारी, अहमदनगर २) जिल्हा माहिती अधिकारी,अहमदनगर
१)अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर
२)आयुक्त,अहमदनगर महानगरपालीका, अहमदनगर
३)उपविभागीय दंडाधिकारी, अहमदनगर
४)उपविभागीय पोलीस अधीकारी,नगर ग्रामीण उपविभाग,अहमदनगर
५)तहसीलदार, अहमदनगर
६)प्रभारी अधिकारी, एमआयडीसी पो.स्टे.व श.वा.शा. अहमदनगर
यांनी वर नमूद आदेशाप्रमाणे आपले नेमणुकीचे पोलीस अधिकारी व अंमलदार नेमावेत व नमुद मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी बॅरीकेटींग करुन आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी.