शहरातील नामांकित हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा तिघांवर गुन्हा दाखल
अहमदनगर (दि.७ जुन):-अहमदनगर शहरात सर्जेपुरा येथील एका तळघरात सुरू असलेल्या हुक्का पार्लर वर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत हुक्का पार्लर चालविणाऱ्या व हुक्का ओढणाऱ्या दोघांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई ५ जुन रोजी करण्यात आली असून हुक्का ओढण्यासाठी लागणारे वेगवेगळे फ्लेवर असा एकूण १४ हजार ८५० रू.किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तोफखाना पोलीस ठाण्यात गुरनं.६९३/२०२४ सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण विनीनियम) अधी.२००३ चे सुधारित अधिनियम २०१८ चे कलम ४ (अ)/२१ (अ) प्रमाणे तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक खैरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव,पोलीस अंमलदार संदीप पवार, संतोष खैरे,बाळासाहेब गुंजाळ,संभाजी कोतकर आदींनी केली आहे.