उडान प्रकल्पाची खेड्या पाड्यात वाड्या वस्तीवर बालविवाह मुक्त करण्यासाठी धडाकेबाज जनजागृती मोहीम….
नगर (७ जून प्रतिनिधी):-अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा आहे.
जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी स्नेहालय संचलित उडान प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे.जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रम राबवणे,बालविवाह प्रतिबंध करणे,पुनर्वसन शिक्षण आरोग्य आणि स्वावलंबन या प्रमुख उद्दिष्ट समोर ठेऊन जिल्ह्यात काम सुरू आहे.जिल्ह्यात बालविवाह जनजागृती मोहीम यशस्वीरित्या सुरू आहे.नगर तालुक्यातील वेगवेगळ्या गावात जाऊन जनजागृती मोहीम राबवली जात आहे.यामुळे अनेक महिला बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
या अनुषंगाने गुरवारी (६ जून ) रोजी नगर तालुक्यातील ससेवाडी आणि जेऊर या गावातील शेतकरी महिलांना एकत्रित करून बालविवाह प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी प्रथम स्नेहालय संस्था आणि उडान प्रकल्पाची माहिती देऊन ओळख करून दिली.उपस्थित असणाऱ्या महिलांना बालकांचे अधिकार विषयी माहिती देण्यात आली.नगर जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण हे ग्रामीण भागात जास्त प्रमाणात दिसून येत आहे.अश्या अपराधामुळे बालकांचे अधिकाराच्या उल्लंघन होतात.
बालविवाह बाबत घडामोडी या वेळी सांगण्यात आल्या. यामुळे बालविवाह मुळे किती मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतात याचे गांभीर्य पटवून देण्यात आले.गावातील ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम पाहतात.तर त्यांना सह्या करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांची नेमणूक केली आहे. तसेच गावात बाल संरक्षण समिती बदल माहिती देऊन गावात अश्या समित्या स्थापन करण्यासाठी सर्व महिलांना पुढाकार घ्यावा असेही यावेळी सांगितले.बालविवाह झाल्यानंतर कोणते दुष्परिणाम होऊ शकते याबदल सुद्धा माहिती दिली.तसेच शासकीय योजना,पालक सक्षमीकरण,मुलांचे पालन पोषण करताना कोणती काळजी घेतली पाहिजे..? याबदल ही मार्गदर्शन करण्यात आले.बालविवाह कोणत्या कारणांमुळे होतात याविषयी सविस्तर माहिती देऊन, त्यावर पालकांनी कसे काम करावे..याबदल योग्य मार्गदर्शन केले.
यामुळे उपस्थित असणाऱ्या महिलांमध्ये चागल्या प्रमाणात जागृती निर्माण झाली. असे सर्व महिलांकडून प्रतिसाद आला.आम्ही आमच्या परिसरात बालविवाह होऊ देणार नाही जर होत असल्याचे दिसून आले तर ताबडतोब उडान टीमला कळवू,आमचे गाव बालविवाह मुक्त गाव करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ असे आज महिलांनी निर्धार केला.हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता समुदाय संसाधन व्यक्ती (CRP) भावना महिला ग्राम संघाचे अध्यक्ष/सचिव, उडान टीम प्रविण कदम,शशिकांत शिंदे,शाहिद शेख,पूजा झिने,सीमा जुनी यांनी परिश्रम घेतले.