सामाजिक कार्यकर्त्या ज्योतीताई मोकळ यांना महाराष्ट्रासाठी २४ तास पुरस्कार प्रदान
पुणे प्रतिनिधी:-दौंड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या ज्योतीताई मोकळ यांना त्यांच्या समाजकार्याची दखल घेत महाराष्ट्र न्यूज 1/24 तास यांच्याकडून ‘महाराष्ट्रासाठी 24 तास’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.या पुरस्कार सोहळ्याचे स्वरूप ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक होते.महिलांसाठी अहोरात्र 24 तास झगडणाऱ्या त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत.महिलांना मात्र ज्योतीताईनी स्वत:च्या पायावर उभे राहण्याची ताकद आणि आत्मविश्वास दिला.ज्योतीताई म्हणजे सामाजिक कार्य,महिलांचे शिक्षण,पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध असणार्या धडाडीच्या कार्यकर्त्या.समाजात महिलांना बरोबरीचे स्थान मिळाले पाहिजे यासाठी त्या कायम आग्रही राहिल्या.
आर्थिकदृष्ट्या संपन्न महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन त्यांनी बदलवण्याचा प्रयत्न केला. ‘महिला कामगार चळवळीतील लढवय्यी कार्यकर्ती’ अशी त्यांची ओळख आहे.
पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना सामाजिक कार्यकर्ता ज्योतीताई मोकळ म्हणाल्या की,शहरात सर्व महापुरुषांच्या जयंत्या तसेच रक्तदान शिबिर महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कायम प्राधान्य देणार,यावेळी महाराष्ट्र न्यूज 1/24 चे मुख्य संपादक उपचंद शेलार,सहसंपादक रूपालीताई कापुरे यांच्यासह परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.