अवघ्या १२ तासाच्या आत दरोड्यातील आरोपी जेरबंद तोफखाना पोलीसांची कारवाई;आरोपींच्या गाडीत साडेचार किलो गांजा हस्तगत
अहमदनगर (दि.१३ जुन प्रतिनिधी):-बोल्हेगांव येथे अविनाश मांडगे यांच्या मोपेड मोटार सायकल वाहनास चारचाकी वाहनाने धडक देवुन त्यांना खाली पाडुन त्यांच्या कडील 17,000/-रु.किंमतीचे मोबाईल हॅण्डसेट व 2,00,000/-रोख रक्कम बळजबरीने हिसकावुन आरोपी त्यांच्या कडील चारचाकी वाहनातुन पळुन गेले वगैरे फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात गु.र.नं.716/2024 भा.दं.वि.क 392,427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने या गुन्हयाचे तपासाकामी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांनी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार केले व पथकाला तपासाच्या योग्य ते मार्गदर्शन केले.पथक गुन्हयाचे तपासात असताना पोनि/श्री.आनंद कोकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सदरचा गुन्हा हा प्रकाश रावसाहेब उमाप रा. सुडके मळा,गणपती मंदिराचे पाठीमागे बालीकाश्रम रोड,प्रतिक सतीष सुडके रा.सुडके मळा नवनाथ मेडीकल जवळ यांनी व त्यांच्या साथीदारांनी केले असल्याची बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक कोकरे यांनी तशा पथकास सुचना देवुन तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांना कारवाई करण्यास सांगितले.पोलीस पथकाने सापळा लावुन गुन्हयातील आरोपी तुषार अनिल मोरे रा.नाव्हरा,राजु कॉम्प्लेक्स जवळ,ता. शिरुर जिल्हा पुणे,बादल राजु बोराडे रा.प्रेमदान हाडको,ओंकार ईश्वर कोरेकर रा.नाव्हरा कोरेकर वस्ती ता.शिरुर जिल्हा पुणे असे होंन्डा सिटी कार क्र.एम एच 46 ए एल 6897 हि सह नगर कल्याण रोडवर मिळुन आले.
सदर आरोपी यांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे घेवुन येवुन त्यांचे कडील होंन्डा सिटी कार क्र.एम एच 46 ए एल 6897 मधुन उग्र वास आल्याने नमुद कारची झडती घेतली असता सदर गाडीमध्ये सुमारे साडेचार किलो वजनाचा गांजा नावाचा आमली पदार्थ मिळून आला त्यावरुन आरोपी नामे तुषार अनिल मोरे,बादल राजु बोराडे,ओंकार ईश्वर कोरेकर यांचे विरुध्द तोफखाना पोलीस येथे स्टेशन गुरनं 718/2024 एनडीपीएस कायदा कलम 8 (क) 20 (ब)(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोउपनिरी श्री.सचिन रणशेवरे व पोउपनिरी श्री.शैलेश पाटील हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पेालीस अधीक्षक,श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. श्री.आनंद कोकरे,पो.उप निरी.सचिन रणशेवरे,पो. उपनिरी.श्री.अमोल गायधनी,पोहेकॉ/दत्तात्रय जपे,पोहेकॉ/सुनिल शिरसाट,पोहेकॉ/दिनेश मोरे,पोहेकॉ/अहमद इनामदार,पोहेकॉ/ भानुदास खेडकर, पोहेकॉ/सुधीर खाडे, पोना/सुरज वाबळे,पोना/ संदिप धामणे,पोकॉ/ शिरीष तरटे,पोकॉ/ दत्तात्रय कोतकर,पोकॉ/ बाळासाहेब भापसे,पोकॉ/सुमीत गवळी,पोकॉ/सतीष त्रिभुवन,पोकॉ/सतीष भवर व मोबाईल सेलचे पोकॉ/राहुल गुंडू व पोकॉ/नितीन शिंदे यांनी केली आहे.