पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणेच्या भेटीनंतर खासदार निलेश लंके यांनी दिले स्पष्टीकरण
अहमदनगर (दि.१४ जुन प्रतिनिध):-पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणेच्या भेटीनंतर खासदार निलेश लंके यांचे स्पष्टीकरण दिले आहे की,आपण समाजकार्यात काम करणारी माणसं आहोत कोणीही गाडीला हात केला की थांबतो.काल त्यांच्या घरासमोरून जात असताना त्यांनी हात केला.मी थांबलो त्यांनी चहा प्यायला चला म्हणून सांगितले.आम्ही चहा घेतला.
त्यांनी माझा सत्कारही केला.तोपर्यंत मला समोरील सन्माननीय व्यक्ती कोण त्यांची पार्श्वभूमी काय आहे,हे माहिती नव्हते. आज सकाळी मला कळाले की काल ज्यांना आपण भेटलो ते अशा अशा प्रवृत्तीची व्यक्ती होती.
मला आधी माहिती असते तर मी तेथे गेलो नसतो.ही घटना अपघाताने घडली.तरीही ती चूकच म्हणावी लागेल.असे नगर दक्षिणचे खासदार नीलेश लंके म्हणाले.