शेतातील तुरीच्या गोण्या चोरट्याने केल्या लंपास
अहमदनगर प्रतिनिधी (दि.९.जानेवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव,थेरगाव शिवारातील शेतातून गट नंबर ५३९ मध्ये अज्ञात चोरट्याने सोळा हजार रुपये किमतीच्या ४ काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीत असलेली तुरी चोरून नेली.याबाबत फिर्यादी गुलाब बाबा लाढाने (वय ३७,रा. डिकसळ,ता.कर्जत) यांच्या फिर्यादीवरून मिरजगाव पोलीस स्टेशन येथे भादविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कायम होणाऱ्या चोर्यांबाबत परिसरातील नागरिक भयभीत झाले असून रात्रीची गस्त वाढविण्यात यावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे. पुढील तपास पोहेकॉ/रोकडे करीत आहेत.