आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेला ४० वर्ष पुर्ण झाल्याबद्दल संस्थेमार्फत “भक्ती की लेहर” अंतर्गत मोफत आरोग्य व रक्त चाचणी शिबिर संपन्न,शिबिरात १२० नागरिकांनी घेतला सहभाग डॉ.अर्चना पतंगे यांची माहिती
अहमदनगर प्रतिनिधी (दि.८.जानेवारी):-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेला ४० वर्ष पुर्ण झाल्याबद्दल संस्थेमार्फत “भक्ती की लेहर” अंतर्गत मोफत आरोग्य व रक्त चाचणी शिबिर मंगलमूर्ती क्लिनिक,शिवाजी नगर,नगर कल्याण रोड येथे रविवार दि.८ जानेवारी रोजी राबविण्यात आले.या उपक्रमामध्ये डॉ.तानवडे यांची लॅबची टीम व डॉ.दीपक कारखाले आणि आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर डॉ.अर्चना पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.नागरिकांची रक्त तपासणी प्रसिद्ध डॉ.तानवडे यांची लॅब टेक्निशियन व सहायक टीम यांनी केली.या उपक्रमाचा जवळपास १२० स्थानिक नागरिकांना लाभ घेतला.या उपक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे स्वयंसेवक श्री.रविराज चित्याल,श्री.राजेंद्र घुले,आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर अशोक तळेकर यांनी केले.या शिबिरास स्थानिक नगरसेवक शाम (अप्पा) नळकांडे व नगरसेवक सचिन शिंदे उपस्थित होते व त्यांनी हे शिबिर सुरळीत पार पाडण्यास संस्थेस मदत केली.भविष्यात मोफत ध्यान शिबिरासाठी जागा व सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी जी काही मदत लागेल ती अहमदनगर मनपा तसेच आमच्या वतीने नक्कीच करू असे आश्वासन दोन्ही नगरसेवकांनी यावेळी दिले.हा शिबिराचा कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर डॉ.अर्चना पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला, यावेळी शिबिरासाठी परिसरातील नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.