अहमदनगर जिल्हा पोलीस दलामध्ये पोलीस भरती प्रक्रिया १९ जुन पासून सुरू
अहमदनगर (दि.१७ जुन प्रतिनिधी):-अहमदनगर जिल्हा पोलीस दलामध्ये आस्थापनेवर पोलीस शिपाई बॅण्डस्मन यांची २५ पदे व चालक पोलीस शिपाई यांची ३९ पदांची भरती प्रक्रिया बुधवार दि.१९ जुन रोजी सकाळी ०५.०० वा.पासुन पोलीस मुख्यालय,सर्जेपुरा,अहमदनगर येथे सुरु होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आज दि.१७ जुलै रोजी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी उमेदवारांना अडचणी आल्यास दिला हेल्पलाइन नंबर
या पदाकरीता १९४७ उमेदवारांनी आवेदन अर्ज व चालक पोलीस शिपाई या पदा करीता ३९०९ असे एकण ५८५६ उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत.भरती प्रक्रिया वेळी सर्वप्रथम उमेदवारांची प्राथमिक कागदपत्र पडताळणी,शारिरीक पात्रता व उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे.मैदानी चाचणी वेळी पावसामुळे व्यत्यय आल्यास अगर मैदानी चाचणी होवु न शकल्यास उमेदवारांना पुढील सुयोग्य तारीख देण्यात यईल यांची सर्वांनी नोंद घ्यावी.
- काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरीता एका पेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणी करीता हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली असेल अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल.मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान ४ (चार) दिवसांचे अंतर ठेवुन पुढ़ील सुयोग्य तारीख देण्यात येईल.मात्र या करीता उमेदवारांनी पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावा दुस-या मैदानी चाचणीचे वेळी सादर करावे लागतील,असा अर्ज उमेदवार स्वत: हजर राहुन अगर sp.ahmednagar@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकतील.
उमेदवारांना इतर काही अडचणी अगर शंका असल्यास उमेदवारांनी नियंत्रण कक्ष अधिकारी, जिल्हा अहमदनगर यांचेशी संपर्क साधुन आपली अडचण अगर शंका नोदवावी.
नियंत्रण कक्ष अधिकारी, अहमदनगर यांचे कडील संपर्क क्रमांक-
१)०२४१-२४१६१३२
२)मोबाईल क्रमांक:-९१५६४३८०८८
यावेळी पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश पोला यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व पोलीस अधिकारी उपस्थित होते.