पतीने पत्नीवर संशय करत दगडाने ठेचून केली हत्या नगर शहरातील घटना
अहमदनगर (दि.१८ जुन प्रतिनिधी)::-नगर शहरात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सिद्धार्थ नगर येथे पतीने पत्नीचा निर्घृण खून केला असून पती हा पत्नीवर कायम संशय करत होता.
यातूनच त्याने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केली.ही घटना दि.१७ जुन रोजी रात्री घडली असून आज सकाळी उघडकीस आली आहे.सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तात्कळ दाखल होऊन पुढील तपास करीत आहे.