अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना जिल्ह्यातून हद्दपार करा पीडीतेच्या नातेवाईकांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
नगर (दि.१८ जुन प्रतिनिधी):-बोल्हेगाव परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी समीर अब्दुल कादिर शेख,आकाश यशवंत आल्हाट,हर्षद उजागरे,अक्षय साळवे व इतर ५ ते ६ आरोपींवर तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे.
यातील समीर अब्दुल कादिर शेख,आकाश आल्हाट,हर्षद उजागरे यांना या गुन्ह्यात तोफखाना पोलिसांनी अटक केली असून परंतु यातील अक्षय साळवे व त्याच्या सोबतचे पाच ते सहा आरोपी अद्यापही या गुन्ह्यात फरार असून त्यांच्या कडून पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना दमदाटी करण्यात येत असून हे सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावे अशी मागणी पीडीतेच्या घरच्यांकडून जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे दि.१८ जुन रोजी करण्यात आली आहे.