आर्य कुटुंबियांची मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी घेतली भेट;मुलीच्या पुढील शिक्षणासाठी डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून देणार आर्थिक मदत
अहमदनगर (दि.२१ जुन प्रतिनिधी):-मुलीच्या उपचारासाठी हिंदू धर्मातून पुन्हा मुस्लिम धर्मात जाण्याचा निर्णय घेणारे अहमदनगर येथील शिवराम आर्य यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी मा.नगरसेवक धनंजय जाधव यांच्यासह अहमदनगर येथे भेट घेतली.
आर्य कुटुंबातील अश्विनी आर्य हिच्या मेंदूत गाठ तयार झाल्याने तिच्यावर उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च येणार होता.मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या वतीने शस्त्रक्रियेसाठी दोन लाख रुपये देण्यात आले.सोबतच अश्विनीच्या पुढील शिक्षणासाठी डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याचेही आश्वासन यावेळी चिवटे यांनी दिले.दरम्यान अश्विनी आर्यचे वडील शिवराम आर्य यांना यावेळी अश्रू दाटून आले त्यांनी अश्विनीला मदत केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, मा.नगरसेवक धनंजय जाधव यांचे आभार मानले.