गुटख्याची वाहतुक करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह पकडले
अहमदनगर (दि.२१ जुन प्रतिनिधी):-जामखेड तालुक्यातील खर्डा येथे गुटख्याची वाहतुक करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह पकडले आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की गुटखा विक्री करण्यासाठी खर्डा ते भुम जाणाऱ्या रोडवर,खर्डा गांवातील टोलनाक्या जवळ दोघे येणार आहे.
अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने बातमीतील ठिकाणी खर्डा ते भुम जाणारे रोडवर,टोलनाक्या जवळ जावुन सापळा लावुन थांबलेले असतांना थोडाच वेळात भुम रोडने एक इसम बुलेट मोटार सायकलवर गोण्या घेवुन बंद पडलेल्या टोलनाक्या जवळ येवुन थांबला. त्याच वेळी खर्डा गांवाकडुन शाईन मोटार सायकलवरील इसम बुलेटवरील इसमा जवळ जावुन थांबला.त्यावेळी बुलेट वरील इसम त्याचे कडील गोण्या शाईन मोटार सायकलवर बसलेल्या इसमास देत असताना पथकाची खात्री झाल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यातील इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे किरण अशोक बोराडे रा.पाथरुड,ता. भुम, जिल्हा धाराशिव व 2) गणेश सतिष काकडे रा. कुसडगांव,ता.जामखेड असे असल्याचे सांगितले.दोन्ही इसमांचे कब्जातील गोण्याची झडती घेतली असता 27,000/-रुपये किंमतीचा आरएमडी पानमसाला,18,000/- एम गोल्ड सेंटेड तंबाखु, 35,000/-रुपये किंमतीचे 2 मोबाईल फोन,1,50,000/- रुपये किंमतीची बुलेट व 80,000/-रुपये किंमतीची शाईन मोटार सायकल असा एकुण 3,10,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने.सदर पान मसाला व सुगंधी तंबाखु बाबत विचारपुस करता किरण बोराडे याने समाधान खुळे,रा. परांडा,जिल्हा धाराशिव याने पाठविली असुन गणेश काकडे यास विक्री करण्यासाठी या ठिकाणी आणली असल्याचे सांगितले.
समाधान देविदास खुळे रा.परांडा, ता.धाराशिव (फरार) याने पाठविलेला पान मसाला व सुगंधीत तंबाखु विक्री करण्यास महाराष्ट्र राज्यामध्ये बंदी आहे हे माहिती असतांना कब्जात बाळगतांना मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द खर्डा पो.स्टे. गु.र.नं. 116/2024 भादविक 328,188, 272,273 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे साहेब,अपर पोलीस अधीक्षक व श्री. विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी,कर्जत विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेतील संतोष खैरे,रोहित मिसाळ,रणजीत जाधव यांनी केलेली आहे.