Maharashtra247

नगर तालुका हद्दीत अरणगाव परिसरात ट्रक कंटेनर व स्विफ्ट तीन वाहनांचा भीषण अपघात तीन ठार..

अहमदनगर (दि.२२ जुन प्रतिनिधी):-नगर तालुक्यातील बाह्यवळण रस्त्यावर अरणगाव परिसरात शनिवारी दि.२२ जुन रोजी सकाळी ८.०० वाजेच्या सुमारास ट्रक-कटेंनर व स्विफ्ट या तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.अपघाताची माहिती मिळताच अरणगाव ग्रामस्थांसह नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याच ठिकाणी गेल्या आठ दिवसांपूर्वी दोन वाहनांचा अपघात झाला होता.त्यात दोन जण जखमी झाले होते.

त्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते.साईड पट्या,सर्व्हिस रोड,दिशादर्शक फलक,तसेच कायमस्वरूपी येथे पोलीस ड्युटीवर असले पाहिजे या आश्‍वासनानंतर कार्ले यांनी आंदोलन मागे घेतले होते.या अपघातामुळे वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत.सार्वजनिक बांधकाम विभाग व एनएचआयकडून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम उशिरा पर्यंत सुरु होते.

You cannot copy content of this page