सामाजिक कार्यकर्ते मयुर बांगरे यांच्या वाढदिवसानिमित्त आराध्य प्रतिष्ठानच्या वतीने मनपा शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप;विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन, शाळेचे परिसराचे नाव उज्वल करावे-मयुर बांगरे
नगर (दि.२२ जुन प्रतिनिधी):-आज समाजातील अनेक घटक मुलभुत सुविधांपासून वंचित आहे.
मुलांच्या उज्वल भविष्यास घडविण्याचे काम शाळेच्या माध्यमातून होत आहेत.हे शिक्षण घेत असतांना अनेक विद्यार्थ्यांना अडचणी येत असतात. यासाठीच वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन छोटीशी मदत केली आहे. वाढदिवसाचा अनावश्यक खर्चास फाटा देत या उपक्रमाचे आयोजन केले आहे.मनपाच्या या शाळेत सर्वसामान्य-गरीब कुटूंबातील मुलं-मुली शिक्षण घेत आहेत.
शिक्षकांच्या सहकार्याने त्यांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यास आपले कायम सहकार्य राहील. विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन, शाळेचे परिसराचे नाव उज्वल करावे, असे प्रतिपादन आराध्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयुर बांगरे यांनी केले.आराध्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयुर बांगरे (बालीशेठ) यांच्या वाढदिवसानिमित्त रेल्वे स्टेशन येथील मनपाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वा खाऊचे वाटप करण्यात आले याप्रसंगी निलेश बांगरे, दिपक लोंढे, कुमार डाके, अभय रणदिवे, संदिप भगोरे, अमोल रणदिवे, पंडित खुडे, शरद वाकचौरे, सचिन पवार, मुख्याध्यापक श्री.घिगे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी दिपक लोंढे म्हणाले, बालीशेठ बांगरे यांच्या सामाजिक कार्यात नेहमीच मोठे योगदान राहिले आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी कायम तत्पर राहून ते सोडवतात. त्याचबरोबर विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, महिला बचत गटांना प्रोत्साहन, ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी, अशा सर्वांसाठी ते नेहमी कार्यरत आहेत.आज वाढदिवसानिमित्त मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन मोठा हातभार लावला आहे, अशा उपक्रमाची समाजाला गरज असल्याचे सांगितले.
यावेळी मुख्याध्यापक श्री.घिगे यांनी या शाळेत सर्वसामान्य व गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. त्याचबरोबर विविध स्पर्धा, परिक्षांसाठीही मार्गदर्शन केले जाते.आज बालिशेठ बांगरे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासास हातभार लागेल, असे सांगून आभार मानले.
यावेळी शिक्षक सर्वश्री आठरे, श्रीमती शिंदे, कवडे, लोंढे आदिंसह पालक, प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शैक्षणिक साहित्य, खाऊ मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद दिसून येत होता.