नगरमध्ये खुनाचा प्रयत्न करून पसार झालेला आरोपी एमआयडीसी पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून पकडला
अहमदनगर (दि.२३ जुन प्रतिनिधी):-खुनाचा प्रयत्न करणा-या फरार असलेल्या आरोपीस एमआयडीसी पोलीसांनी सातारा जिल्हयात तपास करत जेरबंद केले आहे.बातमीची हकीकत अशी की,दि.१५ एप्रिल २०२४ रोजी फिर्यादी नामे तुषार अशोक शेळके (रा.वडगाव गुप्ता.ता.जि.अहमदनगर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की,माझे वड़ील अशोक श्रीधर शेळके यांना शेंडी बायपास रोडवर डोंगरे वस्तीजवळ शिंदे यांच्या शेतात त्यांचा ओळखिचा निखिल शिवाजी गांगर्डे (रा.दत्तनगर वडगाव गुप्ता ता.जि.अहमदनगर) याने पैेशाच्या व्यवहारातुन झालेल्या वादामुळे त्याच्याकडील चाकुने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन त्यांना गंभीररीत्या जखमी केले आहे.
या फिर्यादीवरून एमआयडीसी पोस्टे येथे गुरजिनं ३७५/२०२४ भादवि कलम ३०७,३२७,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचा तपास करत असतांना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि/माणिक चौधरी यांना जिल्ह्याचा सखोल अभ्यास असल्याने सदर गुन्हयातील फरार आरोपी हा सातारा येथे असल्याचे त्यांना गोपनिय माहिती मिळाली लागलीच सपोनी/चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे तपास पथक तयार करुन सदर आरोपीना पकडण्या करीता रवाना केले.पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करत आरोपीस साकुर्डी ता.कराड जि.सातारा येथुन शिताफीने ताब्यात घेतले.आरोपीने सदर गुन्हयाची कबुली दिली.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग श्री.संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि/माणिक चौधरी यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ/नंदकिशोर सांगळे,पोहेकॉ/राजु सुद्रिक,पोहेकॉ/नितीन उगलमुगले,पोना/विष्णु भागवत,पोकॉ/किशोर जाधव,पोशि/नवनाथ दहिफळे,तसेच मोबाईल सेल अहमदनगरचे पोकॉ/राहुल गुंडू यांनी केली आहे.